ई-चलन तक्रारीपैकी ५९% तक्रारी फेटाळल्या – RTI द्वारे माहिती उजेडात

 ई-चलन तक्रारीपैकी ५९% तक्रारी फेटाळल्या – RTI द्वारे माहिती उजेडात

‘वन स्टेट वन चलन’ या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून मुंबई वाहतूक पोलीस विभागाने १ जानेवारी २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तब्बल ₹५५६ कोटी ६४ लाख २१ हजार ९५० इतका दंड वसूल केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या RTI अर्जावरून ही माहिती समोर आली आहे. सदर कालावधीत एकूण १,८१६१३ ई-चलन विरोधात ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १,०७८५० तक्रारी फेटाळण्यात आल्या आहेत. म्हणजेच, जवळपास ५९% तक्रारी अमान्य ठरल्या.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई वाहतूक पोलिसांकडे ई-चलन विरोधात प्राप्त ऑनलाईन तक्रारी बाबत माहिती विचारली होती. मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन प्रकारानुसार (दुचाकी, चारचाकी, प्रवासी वाहन, मालवाहू इत्यादी) तक्रारींचे वर्गीकरण सध्या पोर्टलवर उपलब्ध नाही, त्यामुळे विशिष्ट वाहन गटांवरील कारवाईचे विश्लेषण करणे शक्य नाही.

तक्रारींची पडताळणी प्रक्रिया:

‘वन स्टेट वन चलन’ पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारी मल्टिमिडीया सेल, वरळी येथे तपासल्या जातात. यामध्ये वाहनांच्या प्रतिमा आणि इतर दृश्यांतील पुराव्यांचे मूल्यांकन होते. पुरावे अस्पष्ट असतील तर त्या तक्रारी संबंधित वाहतूक विभागाकडे पुढील पडताळणीसाठी पाठवल्या जातात.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले की ई-चलन प्रणाली पारदर्शक असावी, नागरिकांना त्यांचे स्पष्टीकरण देण्याची संधी मिळावी आणि प्रत्येक तक्रारीची सखोल तपासणी व्हावी, ही काळाची गरज आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *