५५ व्या इफ्फी महोत्सवाचे गोव्यात शानदार उद्घाटन
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आज संध्याकाळी 5:00 वाजता, 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला. (IFFI) पणजीममधील आयनॉक्स येथे दुपारी 2:00 वाजता, ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकेल ग्रेसी दिग्दर्शित ‘बेटर मॅन’ या चित्रपटाच्या रेड-कार्पेट प्रदर्शनाने उत्सवाची सुरुवात झाली.
उद्घाटन सोहळ्याचे यजमानपद ( अॅंकरींग) प्रसिद्ध चित्रपट व्यक्तिमत्व अभिषेक बॅनर्जी आणि भूमी पेडणेकर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत संपन्न होणाऱ्या 55 व्या इफ्फीचा चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेचा आठवडाभराचा प्रवास सुरू होत असताना ही मनोरंजक संध्याकाळ भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट गोष्टींना एकत्र आणणार आहे. या समारंभात चित्रपटसृष्टीतील अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा सहभाग पाहायला मिळणार आहे ज्यांची केवळ उपस्थिती देखील या चित्रपट महोत्सवाला एक वेगळी रंगत प्रदान करते.
या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला सुभाष घई, दिनेश विजन, अमर कौशिक, एनएम सुरेश, आरके सेल्वामणी, ईशारी गणेशन, रवी कोतारकारा यांसारखे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि गीतकार प्रसून जोशी उपस्थित होते.प्रसिद्ध अभिनेते नागार्जुन, नित्या मेनन, मला, विक्रांत मेसी, रकुल प्रीत, मानुषी छिल्लर, बोमन इराणी, राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, जयदीप अहलावत, रणदीप हुडा, सानया मल्होत्रा, जयम रवी, जॅकी भगनानी, आर. सरथ कुमार, मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी, राधाकृष्णन पार्थिबन यांच्यासह इतर मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.चित्रपटसृष्टीतील तारे तारकांचे हे दिमाखदार संमेलन, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटातील सर्वोत्कृष्ट कलागुणांना एकत्रित आणण्याचं काम या महोत्सवाद्वारे केले जाते.
ML/ML/PGB
20 Nov 2024