गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या मराठी चित्रपटाची निवड
पणजी,दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशियातील सर्वात जुन्या व भारतातील सर्वात मोठ्या 53व्या IFFI आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन उद्यापासून गोवा येथे करण्यात आले आहे. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केटमध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये यावर्षी “राख” या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात, अचानक उद्भवलेल्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना रोजगार गमावू लागल्याने, विपरीत परिणाम होऊन बेरोजगारीच्या संकटात भरडल्या गेलेल्या स्थलांतरित मजुरांच्या दाहक वास्तव या चित्रपटात मांडले आहे.
SL/KA/SL
19 Nov. 2022