ऐन दिवाळीत राजधानीत ५२५ कोटींची मद्यविक्री

नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभर दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात आहे.फराळ, फटाके, विविध फॅशनचे कपडे,आकाशकंदील, नवीन इल्क्ट्रॉनिक्स वस्तू यांच्या विक्रीमुळे बाजाराला चांगला उठाव आला आहे. यातच राजधानी दिल्लीमध्ये मद्यपींनी दारूची प्रचंड खरेदी करून गेल्या वर्षीचा आकडा ओलांडल्याची माहिती समोर आली आहे. राजधानी दिल्लीत २०२२ च्या तुलनेत यावर्षी दिवाळीच्या कालावधीत कालावधीत जवळपास दुप्पट मद्यविक्री झाल्याचा तपशील समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सध्या सणासुदीचा हंगाम आणि ‘ड्राय डे’ असल्यामुळे या काळात मद्याची विक्री वाढते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत सामान्यतः ड्राय डे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे, या काळात सरासरी दारुची विक्री वाढते.
उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या १८ दिवसांत तब्बल ३.०४ कोटी दारूच्या बाटल्यांची विक्री झाली आहे. याची एकूण किंमत तब्बल ५२५.८४ कोटी रुपये इतकी आहे. गेल्यावर्षी दिवाळीपूर्वी याच काळात २.११ कोटी दारूच्या बाटल्यांची विक्री झाली होती. दिल्लीकरांनी दिवाळीपूर्वीच दारूचा साठा केल्याचं यातून दिसत आहे.दिवाळीच्या दोन दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी (१० नोव्हेंबर) १८,८९,९६९ बाटल्या विकल्या गेल्या. मागील वर्षी हा आकडा १५,०४,००० इतका होता.
SL/KA/SL
14 Nov. 2023