देशातील ५०८ रेल्वे स्थानके टाकणार कात…

 देशातील ५०८ रेल्वे स्थानके टाकणार कात…

जालना, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी समारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते online पार पडला असून यामध्ये जालना रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. जालना रेल्वे स्थानकावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

अमृत ​​भारत स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे देशातील ५०८ तर महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा कायापलट केला जाणार आहे.या मध्ये नांदेड विभागातील १३ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.
आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वे स्थानकांच्या नूतनिकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून मराठवाड्यातील ११, विदर्भातील १ आणि तेलगंणा राज्यातील आदिलाबाद या रेल्वे स्थानकांचा कायापलट होणार आहे .

यासाठी केंद्र सरकारकडून ७८४.६० कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. कायापलट होणाऱ्या रेल्वे स्थानकांमध्ये नांदेड विभागातील छत्रपती संभाजीनगर,जालना,परभणी जंक्शन,परतूर, गंगाखेड,पूर्णा जंक्शन, हिंगोली डेक्कन,सेलू, किनवट,मुदखेड जंक्शन, नगरसोल विदर्भातील वाशिम आणि तेलंगणा राज्यातील आदिलाबाद या रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.

रेल्वे स्थानकावरील स्वच्छतागृह,प्लॅटफार्म दुरूस्ती,प्रवाशासाठी आसन व्यवस्था,गाड्यांचे वेळापत्रक अशा विविध सुविधा या स्थानकावर पुरविल्या जाणार आहेत. याशिवाय सुधारित प्रकाश व्यवस्था,चांगले परिभ्रमण क्षेत्र,सुधारित पार्किंगची जागा,दिव्यांग अनुकूल पायाभूत सुविधा,हरित ऊर्जेचा वापर करून पर्यावरणास अनुकूल इमारत इत्यादीचे नूतनीकरण केले जाणार आहे.

जालना रेल्वे स्थानकावर आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला.या वेळी रावसाहेब दानवे यांच्या सह आमदार कैलास गोरंट्याल,राजेश टोपे, नारायण कूचे,आमदार संतोष दानवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना दानवे यांनी अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत जालना रेल्वे स्टेशनच्या कामासाठी १८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. 508 railway stations in the country will be constructed…

ML/KA/PGB
6 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *