महापालिकेतर्फे लवकरच पाच हजार स्वच्छतादूत रस्त्यावर

 महापालिकेतर्फे लवकरच पाच हजार स्वच्छतादूत रस्त्यावर

मुंबई दि.16( एम एमसी न्यूज नेटवर्क): संपूर्ण मुंबईसाठी महापालिकेतर्फे पाच हजार स्वच्छतादूत नेमले जाणार असून त्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छतेत आमूलाग्र बदल करण्याची पालिकेची योजना आहे . यामध्ये हे स्वच्छतादूत कोणतीही दंडात्मक कारवाई करणार नाहीत, तर महानगरपालिकेचे डोळे व कान स्वरुपात प्रत्यक्ष कार्यरत राहणार आहेत तसेच मुंबई सुशोभीकरण प्रकल्पातील कामांची प्रगती व गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालय व संबंधित खात्यांच्या स्तरावर दक्षता समिती स्थापन करण्यात येणार आहे.

जी – २० परिषदेच्या मुंबईतील पहिल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरी सेवा-सुविधांची कामे व सुशोभीकरण अत्यंत वेगाने केले, त्याबद्दल नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जी – २० मधील भारताचे शेरपा अमिताभ कांत यांनी महापालिकेचे कौतुक केले आहे. हीच धडाडी व वेग कायम ठेऊन आता सर्व उपक्रमांमध्ये निश्चित केलेले लक्ष्य गाठावे, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी पालिका आज प्रशासनाला दिले.

मुंबईत नव्याने ५ हजार स्वच्छतादूत नेमले जाणार असून प्रत्येक १० स्वच्छतादूतांमागे १ पर्यवेक्षक नेमला जाणार आहे . हे स्वच्छतादूत क्लीनअप मार्शलप्रमाणे दंडात्मक कारवाई करणारे नसतील, तर ते प्रामुख्याने शहरातील भागात दैनंदिन स्वच्छता, कचरा संकलन इत्यादी बाबींवर देखरेख करतील तसेच जनजागृतीसाठी मदत करतील. स्वच्छतादूतांची कर्तव्ये, कामाच्या वेळा, मानधन इत्यादी अनुषंगाने धोरण तयार करण्याचे काम लवकरच केले जाणार आहे.

या अंतर्गत अरुंद वसाहती व गल्ल्यांमध्ये प्रखर दिवे व विद्युत योजना पालिका करणार करणार असून प्रसाधनगृहांची निरंतर देखभाल व स्वच्छतेसाठी लवकरच धोरण आखण्यात येणार आहे . आपले दवाखाना व प्रसाधनगृहांच्या जागेसाठी प्रकल्प बाधितांना लवकरच योग्य जागा व मोबदला मिळणार आहे . मार्च २०२३ अखेरीसपर्यंत प्रधानमंत्री स्व-निधी योजने अंतर्गत २ लाख नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य राहणार आहे.

मुंबईत आगामी काळात आणखी जी २० च्या ७ बैठका होणार आहेत. त्यात जे साहित्य पुन्हा वापरात येऊ शकते, ते व्यवस्थितपणे जतन करुन ठेवले जाणार असून जेणेकरुन, खर्चाची पुनरावृत्ती होणार नाही,. पुढील २ ते ३ दिवसांत सर्व साहित्य परत आणून जतन केले जाणार आहे . तसेच ज्या वसाहती परिसरांमध्ये आवश्यक आहे, तिथे नवीन प्रसाधनगृहे बांधली जाणार आहे.

त्याचप्रमाणे खास व फक्त महिलांसाठी राखीव असलेली व त्यानुरुप सर्व सुविधा समाविष्ट असलेली किमान २०० प्रसाधनगृहे मुंबईत तयार केली जाणार आहेत. सार्वजनिक प्रसाधनगृहांसाठी तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांसाठी ज्या परिसरांमध्ये जागा उपलब्ध करुन घेताना पुनर्वसन आवश्यक असेल, त्या नागरिकांनी योग्य जागा किंवा मोबदला देता यावा, यासाठी प्रचलित धोरणामध्ये योग्य तो बदल करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार आहे ,अशी माहितीही त्यांनी दिली

SL/KA/SL

16 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *