राज्यात ५०० वाळू साठे! , तुटवडा १५ दिवसांत कमी होणार
नागपूर, दि. २५: महसूल विभागाने राज्यातील ५०० पैकी साडेतीनशे वाळू घाटांच्या लिलावाची तयारी केली असून, सद्या राज्यात निर्माण झालेला वाळू तुटवडा १५ दिवसांत कमी होईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
मंत्री बावनकुळे म्हणाले, की दरवर्षी ३० जून ते ३० सप्टेंबर या काळात राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार वाळू उत्खनन बंद ठेवावे लागते. त्यामुळे सध्या तात्पुरता तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारने ‘एम-सॅंड पॉलिसी’द्वारे कृत्रिम वाळू निर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. प्रत्येक जिल्ह्यात ५० एम-सॅंड क्रशर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांना त्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत. नैसर्गिक वाळूवरील अवलंबन कमी करून स्थायी उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न आहे.
ML/ML/SL