गाझा सिटी रुग्णालयावरील हल्ल्यात ५०० जणांचा मृत्यू

गाझा, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेत गेल्या ११ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. गाझातील अल-अहली रुग्णालयात भीषण मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात तब्बल ५०० जणांचा मृत्यू झाला आहे. या बातमीने संपूर्ण जगाला हादरा बसला आहे.गाझातील अल अहली रुग्णालयात भीषण स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात जवळपास ५०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटामुळे रुग्णालय इमातीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरातील मैदानात मृतदेहांचा खच पडला असून इमारतीच्या खिडक्या-दरवाजेही तुटले आहेत. या मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
हमासने युद्ध पुकारल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीतील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर, इस्रायलने गाझा पट्टीतल्या मानवतावादी सुविधा खंडित केल्या आहेत. गाझा पट्टीत, गेल्या काही दिवसांपासून वीज नाही, पाणी नाही. अत्यंत बिक परिस्थितीमुळे तिथले नागरिक जीव मुठीत धरून मिळेल त्या ठिकाणी स्थायिक होत आहेत. अनेक रुग्णालयातील इंधनसाठा संपत आल्याने रुग्णांचा जीवही धोक्यात आला आहे.
हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर शेकडो क्षेपणास्रं डागून या युद्धाला सुरुवात केली. त्यापाठोपाठ इस्रायलनेही गाझा पट्टीवर क्षेपणास्रं डागली. या युद्धात आतापर्यंत चार हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे.
SL/KA/SL
18 Oct. 2023