५० हजार गोवारी धडकले नागपुरात, केला रास्ता रोको…
नागपूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या 9 दिवसांपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 3 आदिवासी गोवारी बांधवांतर्फे नागपुरात सुरु असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज विदर्भातील तब्बल 50 हजार आदिवासी गोवारीनी नागपुरात धडक दिली आणि उपोषणकर्त्या समाज बांधवांना पाठिंबा देत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी हजारो आंदोलन कर्त्यांनी संविधान चौकात रास्ता रोको केला त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांनी आंदोलन कर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला पण आंदोलनकर्ते रास्ता रोको करुन जिल्हाधिकारी कार्यालयावर जाण्यासाठी प्रयत्न करीत होते.
पोलीसांनी मध्यस्थाची भुमिका घेतल्याने आंदोलनकर्त्यांचा शिष्टमंडळाची भेट जिल्हाधिकारी आणि दूरदृश्य प्रणालीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केल्यामुळे शहरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था खोळंबली होती.
SL/KA/SL
5 Feb. 2024