या मनपाच्या सुरक्षेसाठी होणार ५० टक्के तृतीयपंथियांची नियुक्ती

पुणे,दि.११ (एमएमसी न्यूज नेटवर्क): तृतीयपंथिय व्यक्तींना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी आणि शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय पातळीवर विविध प्रयत्न सुरू आहेत. पुणे महानगरपालिकेने यामध्ये पुढाकार घेत
सुरक्षा विभागात ५० तृतीयपंथी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा मान्यतेचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्तांपुढे सादर केला जाईल. या सुरक्षा रक्षकांना जेथे जास्त नागरिकांची वर्दळ होते अशा प्रमुख पाच ठिकाणांवर नियुक्ती दिली जाणार आहे.
सुरक्षा रक्षक २५ तृतीयपंथीयांना म्हणून नेमण्यात आले आहे. त्यापैकी दहा तृतीयपंथीयांना आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते नियुक्त पत्रक देण्यात येणार होते. मात्र काल आयुक्त शहरात नसल्याने हे नियुक्त पत्रक देण्यात आले नाहीये. या दहापैकी पाच तृतीयपंथीयांना मुख्य इमारतीमध्ये तर इतर पाच जणांना महापालिकेच्या शहरातील इतर वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये नेमण्यात आलं आहे. दरम्यान, उपजीविकेसाठी तृतीयपंथीयांना कामं मिळताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा यांना काम देण्यासाठी लोक नकारच देतात. पर्यायाने तृतीयपंथीय समाज पैसे कमवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात. काही ठिकाणी सिग्नलवर तर काही ठिकाणी गुन्हेगारीत हा समाज दिसतो. यामुळे सगळ्याच तृतीयपंथीयांबद्दल गैरसमज पसरतो, असं या तृतीयपंथीयांचं म्हणणं आहे.
आता महापालिकेची सुरक्षाच तृतीयपंथीयांच्या हातात आल्याने समाजात वावरताना कसलाही किंतु परंतु मनात येणार नाही तर बाकी वाममार्गाला गेलेला तृतीयपंथीय समाज देखील मुख्य प्रवाहात येईल, अशी अशा या तृतीयपंथीयांनी व्यक्त केली आहे. पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरक्षारक्षक म्हणून काम करणारी तनुश्री भोसले ही काही दिवसांपूर्वी शुभम भोसले होती. पण पुढचं आयुष्य तृतीयपंथी म्हणून जगायचं तिनं ठरवलं आणि लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून ती पुरुषाची स्त्री बनली.तिच्या नोकरीचा प्रश्न पुणे महापालिकेने सोडवला आहे.
SL/KA/SL
11 July 2023