पुणे महिला पोलीस कर्मचाऱ्याचे ५० लाखांचे ऑपरेशन केले मोफत

पुणे दि. २६ – पुणे शहर पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी स्मिता किरतकर यांच्यावर फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (Lung Transplant Operations) करण्याचे गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये निश्चित झाले होते. रुग्ण हक्क परिषदेने वारंवार लेखी पाठपुरावा करून गेल्या वर्षी २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीसज उपमुख्यमंत्री असताना ऑपरेशन करिता सुमारे ५० लाख रुपये मंजूर करून घेतले होते ते ऑपरेशन आता पूर्ण झाले आहे.
दुर्मिळ एबी रक्तगट असणाऱ्या स्मिता किरतकर यांच्यासाठी गेले वर्षभर अवयव उपलब्ध होत नसल्याकारणाने महिला पोलीस कर्मचारी स्मिता यांच्यावरचे ऑपरेशन होऊ शकत नव्हते. मात्र गेल्याच आठवड्यात किरतकर यांच्यावरील ५० लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत झाली. ५० लाखांपैकी किरतकर यांनी स्वतः भरलेली १५ लाख रुपयांच्या रकमेचा परतावा देखील त्यांना शासन स्तरावरून परत देण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत स्मिता यांची तब्येत आता स्थिर असली तरी आणखी पंधरा दिवस त्यांच्यावर डी. वाय. पाटील हॉस्पिटल, पिंपरी पुणे येथे उपचार सुरू राहणार आहेत. त्यांचे वरील उपचारांसाठी पिंपरी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे सर्वेसर्वा मुख्य संचालक यशराज पी. पाटील, हॉस्पिटलचे प्रमुख हनुमंत चव्हाण, प्रमोद पाटील यांचे शस्त्रक्रिया करण्याबद्दल रुग्ण हक्क परिसराचे अध्यक्ष उमेश चव्हाण, स्मिता किरतकर यांचा भाऊ समाधान किरतकर, रुग्ण हक्क परिषदेचे समन्वयक राजाभाऊ कदम यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले!
स्मिता किरतकर यांची ५० लाख रुपयांची शस्त्रक्रिया मोफत व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, परिषदेचे मुख्य समन्वयक राजेंद्र (राजाभाऊ) कदम, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक, भारतीय जनता पार्टीचे अमोल शुक्ला, तत्कालीन भाजपचे आणि आताचे राष्ट्रवादीचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, दूरदर्शनचे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद लिमये, रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर अध्यक्ष अपर्णा मारणे – साठ्ये, पुणे शहर पोलीस अतिरिक्त आयुक्त अरविंद चावरिया यांनी अत्यंत तळमळीने लक्ष घालून, पाठपुरावा करून स्मिता किरतकर यांची शस्त्रक्रिया होण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले.
अधिक माहिती साठी —
उमेश चव्हाण, अध्यक्ष – रुग्ण हक्क परिषद
मो. ९८२२०८१५४०
#rugn_hakka_parishad #DevendraFadnavis #CMOMaharashtra #CMRF #rameshwarnaik #bappusahebpathare #rashmishukla #उमेशचव्हाण #umeshchavan