या देशात होणार ५० हत्तींची निघृण कत्तल

आफ्रिकेतील झिम्बाब्वे देशात ५० हत्तींना मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हत्तींची संख्या खूप जास्त वाढल्याने परिसंस्थेवर ताण येत असल्याचे कारण देत हा भयंकर निर्णय घेण्यात आला आहे. वन्यजीव अधिकाऱ्यांच्या मते, या निर्णयामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी होईल. मारलेल्या हत्तींचे मांस स्थानिक लोकांमध्ये वाटले जाईल आणि हत्तीचे दात सरकारला दिले जातील.झिम्बाब्वेतील सेव व्हॅली कंजर्वेंसीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे परिसंस्थेचे संरक्षण होईल, असा विश्वास आहे.
झिम्बाब्वे पार्क आणि वन्यजीव व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, या राखीव क्षेत्रात सुमारे २,५५० हत्ती आहेत. पण या क्षेत्राची क्षमता फक्त ८०० हत्तींची आहे. “हा निर्णय परिसंस्थेचे आणि आसपासच्या समुदायांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक आहे,” असे प्राधिकरणाने म्हटले आहे.
गेल्या पाच वर्षांपासून येथील अधिकारी हत्तींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी २०० हत्तींना दुसऱ्या अभयारण्यात पाठवले, पण ते पुरेसे ठरले नाही. २०२४ मध्ये झिम्बाब्वेमध्ये भयंकर दुष्काळ पडला होता. त्यावेळी २०० हत्तींना मारण्याची परवानगी देण्यात आली होती