तांदळातून ५० बाय ६० फुटाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोट्रेट
वाशीम दि १४:– ज्ञान, संघर्ष आणि समतेचे प्रतीक असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. प्रशिक सहकारी पतसंस्थेच्या वतीने ५० बाय ५० फूट एवढ्या भव्य स्वरूपात तांदळाच्या साहाय्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोर्ट्रेट साकारण्यात आले असून, या कलाकृतीद्वारे महामानवाला अनोखे अभिवादन करण्यात आले आहे.
ही कलाकृती प्रशिक बँक, पुंजानी कॉम्प्लेक्स, कारंजा लाड येथे उभारण्यात आली असून, नागरिकांना मुक्तपणे पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, प्रशिक सहकारी पतसंस्थेच्या सौजन्याने हे अनोखे पोर्ट्रेट साकारण्यात आले असून, सामाजिक भान जपत त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.