वाळूच्या वजनाने अंगावर शेड कोसळून 5 कामगार जागीच ठार…

जालना दि २२:– पत्र्याच्या शेडवर वाळूचा टिप्पर खाली केल्याने 5 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात घडलीय. जाफराबाद तालुक्यातील पासवडी – चांडोळ रोडवर पुलाचे बांधण्याचे काम चालू आहे. या कामासाठी सिल्लोड येथील काही मजूर आले आहेत. यावेळी काल दिवसभर पुलाचे काम करून रात्री विसावा घेण्यासाठी त्यांनी पत्र्याचे शेड केले होते. त्याखाली झोपले असतानाच रात्रीच्या वेळी वाळूचा उपसा करून उपसा केलेली वाळू पत्र्याच्या शेड वर खाली केल्याने शेड मधील पाच मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जातेय. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पासोडी गावच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन कामगारांना दबलेल्या वाळूतून बाहेर काढलं.