5 हजार विद्यार्थ्यांनी केलें ‘राम रक्षा स्त्रोत्र’ पठण
अकोला, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता अकोला महानगर विश्वमांगल्य सभेच्या वतीने शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या प्रांगणामधे श्री देवनाथ मठ पिठाधीश्वर जितेंद्रनाथ स्वामी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात अकोला जिल्ह्यातील 50 शाळांमधील 5 हजार विद्यार्थ्यांनी एकत्रित येत सामुहिकपणे संस्कृत मधील राम रक्षा स्त्रोत्र पठण केले.
विद्यार्थ्यांची भाषा शुद्धी व्हावी,उच्चारणात स्पष्टता यावी लयबद्ध चालीत सामूहिक गायनाने वातावरण निर्मिती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एकाचवेळी तब्बल 5 हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक राम रक्षा स्त्रोताचे पठण केले.
ML/KA/SL
23 Jan. 2023