राज्यभरात ५ हजार ई-बस टप्प्याटप्प्यात दाखल
छत्रपती संभाजीनगर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे मार्गावर सध्या ई-बस धावत आहेत. लवकरच जालना, बीडसह इतर मार्गांवर ई-बस धावताना दिसतील. एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगरला २१४ ई-बस मिळणार असून, यात पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये ७४ ई-बस दाखल होतील. यासाठी जिल्ह्यातील ६ आगारांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या कामाला गती देण्यात येत आहे.
राज्यभरात ५ हजार ई-बस टप्प्याटप्प्यात दाखल होत होत आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागाला दिवाळीपूर्वी ७४ ई-बस मिळण्याची शक्यता आहे. या बसच्या दृष्टीने सिडको बसस्थानकासाठी चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेच्या परिसरात चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. त्याबरोबरच पैठण, सिल्लोड, वैजापूर येथेही चार्जिंग स्टेशनचे काम सध्या सुरू आहे. लवकरच कन्नड आणि गंगापूर येथील चार्जिंग स्टेशनचे काम सुरू होणार आहे.
ML/ML/PGB
28 Aug 2024