लडाखमध्ये युद्ध सरावादरम्यान झालेल्या दुर्घटनेत ५ जवान शहीद

लडाख, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात काल युद्ध सरावा दरम्यान एक दु:खद घटना घडली आहे. रणगाडे नदी पार करताना अचानक पाण्याची पातळी वाढली. त्यात रणगाड्यामधील जवान अडकले. या दुर्घटनेत भारतीय सैन्याचे 5 जवान शहीद झाले आहेत. दौलत बेग ओल्डी हे उंचावरील युद्ध क्षेत्र आहे. सध्या या भागात भारत आणि चीनच सैन्य आमने-सामने आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लडाख दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं. नदी पार टँक नेताना ही दुर्देवी घटना घडली. आम्ही वीर जवानांची सेवा कधीच विसरणार नाही असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
काल बेग ओल्डी भागात रणगाड्यांचा अभ्यास सुरु होता. सैन्याचे अनेक टँक्स इथे आहेत. रणगाडे नदीपार कसे नेले जातात, याचा अभ्यास सुरु होता. एक टँक नदी पार करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक नदीचा प्रवाह गतीमान झाला. त्यात रणगाडा वाहून गेला. या रणगाड्यात 4 ते 5 जवान होते. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. रणगाडा अभ्यासा दरम्यान T-72 टँकमधील जवान बोधी नदी पार करत होते. त्याचवेळी अचानक पाणी पातळी वाढली. बोधी नदी लेहपासून 148 किमी अंतरावर आहे. LAC च्या जवळ ही दुर्घटना घडली.
नदीच्या प्रवाहात T-72 रणगाडा वाहून गेला. हा रशियन बनावटीचा रणगाडा आहे. ज्यूनियर कमिशनड ऑफिसरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. अन्य चौघांचा शोध सुरु आहे. मंदिर मोर्हजवळ रात्री 1 च्या सुमारास अचानक पाणी पातळी वाढली.
SL/ML/SL
29 June 2024