Oscar 2025 साठी 232 शॉर्टलिस्ट चित्रपटांच्या यादीत 5 भारतीय चित्रपट
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने ऑस्कर 2025 साठी शॉर्टलिस्ट केलेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. 232 शॉर्टलिस्ट केलेल्या चित्रपटांच्या या यादीत 5 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.232 पैकी 207 चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी निवडले गेले आहेत. भारतातील शॉर्टलिस्ट केलेल्या चित्रपटांमध्ये असे काही चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप झाले. कांगुवा, ऑल वी इमेजिन एज लाईट, गर्ल्स विल बी गर्ल्स, आदूजीविथम: द गोट लाईफ आणि स्वातंत्रवीर सावरकर हे पाच चित्रपट शॉर्टलिस्ट झाले आहेत. किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपटही ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता, मात्र अंतिम निवडलेल्या चित्रपटांच्या यादीतून हा चित्रपट वगळण्यात आला आहे.
निवडलेल्या सर्व 232 चित्रपटांमध्ये मतदान केले जाईल, त्यानंतर त्यांना ऑस्कर 2025 मध्ये अंतिम नामांकन मिळेल. मतदान 8 जानेवारीपासून सुरू होणार असून 12 जानेवारीपर्यंत चालणार आहे. यानंतर, नामांकित चित्रपटांची अंतिम यादी 17 जानेवारी रोजी ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चरद्वारे प्रसिद्ध केली जाईल.