चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर कुंभमेळ्यांच्या नियमावलीत ५ महत्त्वाचे बदल

प्रयागराज, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील कुंभमेळ्यात मौनी अमावास्येनिमित्त झालेल्या अमृतस्नाना दरम्यान मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांच्या मृत्यू झाला आहे. अनेकजण या घटनेनंतर हरवले असून त्यांचे नातेवाईक आणि पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत आहेत. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांवर उपचार सुरु आहेत. त्यातच आज कुंभमेळ्यातील काही तंबूंना आग लागली आहे. काही दिवसांपूर्वीही अशी घटनाघडली होती. त्यातच रोज लाखोंच्या संख्येने देशभरातील लोक पवित्र स्नान करण्यासाठी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळेच करोडोंच्या गर्दीचे नियमन करण्यासाठी उत्तर प्रदेशातील योगी सरकारने कुंभमेळ्यात उपस्थितांसाठी नियम कडक केले असून पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे VIP पास बंद करण्यात आले आहेत.
- महाकुंभ परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली असून, गर्दीचे योग्य व्यवस्थापन आणि भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली आहे. व्हीव्हीआयपी पास रद्द करण्यात आले असून कोणत्याही विशेष पासद्वारे वाहनांना प्रवेश मिळणार नाही.
- प्रयागराज लगतच्या जिल्ह्यांमधून येणारी वाहने जिल्ह्याच्या सीमेवर थांबवली जात आहेत. शहरात चारचाकी वाहनांना ४ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशबंदी आहे.
- मेळा परिसरात वाहतूक सुरळीत राहावी आणि अनावश्यक थांबे टाळावेत, अशी सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
- जर रस्त्यावर विक्रेते त्यांचे व्यवसाय चालवत असतील, तर वाहतुकीवर परिणाम होणार नाही याची खात्री करून त्यांना रिकाम्या भागात हलवावे, असे आदित्यनाथ म्हणाले. येथे भेट देणाऱ्या लोकांना विनाकारण थांबवू नये.
- अयोध्या-प्रयागराज, कानपूर-प्रयागराज, फतेहपूर-प्रयागराज, लखनौ-प्रतापगढ-प्रयागराज आणि वाराणसी-प्रयागराज यांसारख्या मार्गांवर मेळा परिसरात गस्त वाढवण्यासाठी आणि वाहतूक ठप्प होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. प्रयागराजहून परतीचे सर्व मार्ग खुले आणि विनाअडथळा राहावेत.
- भाविकांना सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन पुढे जाण्याची परवानगी द्यावी. ते मेळा परिसरात जेथे थांबतील, तेथे सर्व होल्डिंगच्या ठिकाणी अन्न व पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात यावी.
- पुढील दोन दिवसांत लाखो भाविक वाराणसी, अयोध्या, चित्रकूट आणि मिर्झापूर येथे प्रार्थना करण्यासाठी पोहोचत असल्याचे आदित्यनाथ यांनी नमूद केले. परिस्थिती लक्षात घेता, त्यांनी या शहरांमध्ये सतत दक्ष राहण्याचे आवाहन केले आणि परिस्थितीनुसार पुढे जाण्यासाठी सीमेवर होल्डिंग क्षेत्रे तयार केली.
- गर्दीचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी आणि मेळा परिसरात योग्य पार्किंग व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी बॅरिकेडिंगचा प्रभावीपणे वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
SL/ML/SL
30 Jan. 2025