अमेरिकी नागरिकत्वासाठीच्या शुल्कात 5 पट वाढ

वॉशिग्टन डीसी, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ट्रम्प यांनी नागरिकत्वाच्या कायद्यांमध्ये महत्त्वाचे बदल करण्याचे धोरण स्वीकारले आहे. अमेरिकन नागरिकत्व देण्याच्या बदल्यात आता पाच पट जास्त पैसे आकारले जाणार आहेत. ट्रम्प यांनी काल ‘गोल्ड कार्ड’ नावाचा नवीन व्हिसा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली. तो 5 मिलियन डलर्स (44 कोटी भारतीय रुपये) मध्ये खरेदी करता येईल. ट्रम्प यांनी याला अमेरिकन नागरिकत्वाचा मार्ग म्हणून वर्णन केले आहे.
ट्रम्प यांनी ‘गोल्ड कार्ड’ हे EB-5 व्हिसा कार्यक्रमाचा पर्याय म्हणून वर्णन केले आणि भविष्यात 1 मिलियन गोल्ड कार्ड विकले जातील असे सांगितले. सध्या, EB-5 व्हिसा कार्यक्रम हा अमेरिकन नागरिकत्व मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. यासाठी लोकांना 10 लाख डॉलर्स (सुमारे 8.75 कोटी रुपये) द्यावे लागतात.
ट्रम्प म्हणाले की, या व्हिसा कार्डमुळे अमेरिकन नागरिकत्वाचा मार्ग मोकळा होईल. लोक हे खरेदी करतील आणि अमेरिकेत येतील आणि इथे भरपूर कर भरतील. त्यांनी असा दावा केला की हा कार्यक्रम खूप यशस्वी होईल आणि राष्ट्रीय कर्ज लवकर फेडू शकेल.
SL/ML/SL
26 Feb. 2025