तुर्कस्तानात २ दिवसात ५ भूकंप, ५ हजार नागरिकांचा मृत्यू
अंकारा,दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल सकाळपासून एकापाठोपाठ एक बसलेल्या भूकंपाच्या ५ भीषण धक्क्यांमुळे मध्यपूर्वतील तुर्कस्तान आणि सिरियामध्ये हाहाकार माजला आहे. तुर्कस्नातमध्ये काल तीन मोठे भूंकप झाल्यानंतर आज पुन्हा दोन भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली असून शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या. या घटनेत आत्तापर्यंत पाच हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून १५ हजारांपेक्षा जास्त नागरीक जखमी झाले आहेत. ११ हजारांपेक्षा जास्त जणांचा शोध घेण्यात आला असून आठ हजारांपेक्षा जास्त जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. याचबरोबर तीन लाखांपेक्षा जास्त भूकंपग्रस्तांना वसतिगृहे आणि विद्यापीठांमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती टर्कीचे उप-राष्ट्रपती फुआत ओकते यांनी दिली.
आणिबाणी लागू
शाळा, महाविद्यालये आठवडाभर बंद राहणार
तुर्कीचे उपाध्यक्ष फुआत ओक्ते यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, देशातील 10 शहरांमध्ये इमर्जन्सी आणि रेड अलर्ट कायम राहणार आहे. आठवडाभर सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. सध्या 200 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. लष्करासाठी आम्ही एअर कॉरिडॉर बनवत आहोत. यामध्ये फक्त विमानांना लँडिंग आणि टेकऑफ करण्याची परवानगी असेल.
7 Feb. 2023