साडेपाचशे आदिवासी पारधी कुटुंबांचे घरांसाठी आझाद मैदानात धरणे
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई,उपनगर आणि नवी मुंबई परिसरातून आलेल्या साडेपाचशे आदिवासी पारधी कुटुंबांने घरांसाठी आजपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरु केले आहे.5.5 hundred tribal Pardhi families to sit in Azad Maidan for their houses
आदिवासी पारसी महासंघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या या धरणे आंदोलनात माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सहभागी होत आपला पाठिंबा व्यक्त केला.
मागील काही वर्षा पासून मुंबई,उपनगर आणि नवी मुंबई या परिसरात राहणाऱ्या आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या कुटुंबासह झोपड़पट्टी,फुटपाथ आणि रस्त्याच्याकडेला राहणाऱ्या आदिवासी पारधी वस्त्यांवर वेळी अवेळी विनाकारण होणाऱ्या पोलीस आणि पालिकेच्या कारवाया थांबविण्यात याव्यात. आमच्या समाजातील सुशिक्षित मुलामुलींना सर्व शासकीय फायदे मिळावेत,झोपड़पट्टीत आणि रस्त्यावर राहणाऱ्यांचे घरे देऊन पुनर्वसन करावे या प्रमुख मागण्या असल्याचे मुंबई अध्यक्ष संतोष पवार यांनी म्हटले आहे.आदिवासी पारधी वस्त्यांमध्ये प्राथमिक नागरिक सुविधा देण्यात याव्यात पाणी,वीज शौचालय,रस्ते,आरोग्य केंद्र, अंगणवाडी आणि व्यवसाय शिक्षण केंद्र उभारण्यात यावे.5.5 hundred tribal Pardhi families to sit in Azad Maidan for their houses
आदिवासी पारधी यांना उपजीविकेचे साधन नसल्यामुळे त्यांना तात्काळ रेशन कार्ड, आधार कार्ड,पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्र इत्यादी मिळविण्याकरीता शासकीय स्तरावर युद्धस्तरावर प्रयत्न व्हायला हवेत. फुटपाथ आणि फ्लाई ओवर ब्रिजखाली राहणाऱ्या आदिवासी पारधी समाजाचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्यात यावे.
समाजातील युवक, युवतींना आदिवासी विकास मंत्रालयाकडून वाहन चालक परवाने त्याचबरोबर सरकारी बँकेद्वारा कर्ज उपलब्ध करून देऊन लघु उद्योगाकरिता आर्थिक सहाय्य करण्यात यावे. समाजातील मुलांच्या शिक्षणाकरता आश्रम शाळा भरण्यात याव्यात.
रस्त्यांवरती लिंबू मिरची विकणे,फुगे विकणे,फुले विक्री, फुलांच्या माळा विकणे आदी व्यवसाय करतात त्यांना पालिकेकडून परवाने देण्यात यावेत शासनाकडून मिळणारी योजना आदिवासी पारधी समाजाला लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात या मागणी करिता हे आंदोलन करण्यात आलं आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही असे आदिवासी पारधी महासंघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले.
SW/KA/PGB
2 Dec .2022