जळगावातील ४७ हजार लोकांना मिळाली लाईट बिलापासून सुटका

 जळगावातील ४७ हजार लोकांना मिळाली लाईट बिलापासून सुटका

जळगाव, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र शासनाच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज अर्थात सौरऊर्जा योजनेंचा सुयोग्य वापर करत जळगाव जिल्ह्यातील ४७ हजार ३१२ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत वीजबिलातून मुक्तता मिळविली आहे.या योजनेंतर्गत तीन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून अनुदान दिले जाते. यात सौरऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला ७८ हजारांपर्यंत अनुदान लाभ मिळत आहे.

कृषी पंप योजनेत जळगाव जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात विजेची मागणी वाढते. महावितरणकडून वेळी-अवेळी खंडित होणारा वीजपुरवठा, वारंवार करण्यात येत असलेले भारनियमन यामुळे घराच्या अथवा इमारतीच्या छतावरच हजारो वीज ग्राहकांकडून सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.

घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसविता यावा, यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे. कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. घरे, इमारतींच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीज ग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान दिले जाते आहे. या योजनेच्या जळगावकरांनी युक्तीने उपयोग करून घेतला आहे. वीज वापर कमी झाल्याने पर्यावरण रक्षणाला देखील हातभार लागत आहे.

SL/ML/SL 21 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *