डोंबिवलीत ४५ वर्ष जुनी इमारत खचली; जीवितहानी टळली…

ठाणे दि १६: — डोंबिवली पश्चिम येथील गुप्ते रोडवरील सीमंतिनी सोसायटी ही सुमारे ४५ वर्ष जुनी इमारत आज अचानक खचली. इमारतीच्या भेगा पडल्याचे लक्षात आल्यानंतर सतर्क झालेल्या रहिवाश्यांनी तातडीने इमारत खाली केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला असून इमारतीच्या आजूबाजूचा परिसर लोकं जमा झाले आहेत. ही इमारत जुनी व जीर्ण अवस्थेत होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.