मुंबई महानगरात ४४ गोविंदा जखमी

 मुंबई महानगरात ४४ गोविंदा जखमी

छायाचित्र प्रातिनिधीक

मुंबई दि.7( एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई व ठाण्यात दहीहंडीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी पथकांनी गर्दी केली आहे. आज दुपार पासून सायंकाळ पर्यत विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना मुंबईत 35 तर ठाण्यात 9 गोविंदा जखमी झाले. मुंबईत 35 पैकी चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 9 जणांवर उपचार करून सोडून देण्यात आले.उर्वरित 22 जण ओपीडी मध्ये उपचाराधीन आहे.

ठाणे शहरात ही गोविंदा पथकातील 9 दहीहंडी फोडताना जखमी झाले आहे. त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता पर्यत या दोन्ही शहरात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडल्याची नोंद नाही.
दहीहंडी फोडताना जखमी होणाऱ्या गोविंदांवर उपचार करण्यासाठी मुंबई महापालिकेने शहर आणि उपनगरातील सर्व रुग्णालयांमध्ये १२५ खाटा सज्ज ठेवल्या आहेत. पालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दहा, परळ येथील केईएम रुग्णालयात सात आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात चार खाटा आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच १६ उपनगरीय रुग्णालयांत १०५ खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पालिकेने तीन पाळ्यांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर सर्व औषधे, इंजेक्शन आणि सर्जिकल साहित्य, प्लास्टर, एक्स रे व इतर मशीनही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान शहरात आणि उपनगरात दहीहंडी फोडताना 35 गोविंदा जखमी झाले असून यात केईएम रुग्णालयात 16 , सायन – 7, नायर -1 ,जे जे – 2 राजावाडी रुग्णालय – 3 , पोद्दार – 1 तर पश्चिम उपनगरात सांताक्रूझच्या व्ही एन देसाई रुग्णालय -2 व कूपर रुग्णालयात 2 असे 35 जखमी जखमी झाले.त्यापैकी चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 9 जणांवर उपचार करून सोडून देण्यात आले.उर्वरित 22 जण ओपीडी मध्ये उपचार सुरू आहे.

ठाणे जिल्ह्यात 9 जण जखमी

ठाणे शहरात दहीहंडी उसत्व शिगेला पोहचला असताना गोविंदा पथकातील 9 जण दहीहंडी फोडताना जखमी झाले.
त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय उपचाराकरिता दाखल करण्यात आले. जखमी मध्ये अनिकेत अनिल मेंढकर (रा. चिराग नगर, ठाणे), अक्षय कडू (25 ),नरेंद्र धामनराव वाल्मिक (रा. मुलुंड ),पीयूष पी. लाला (18,रा. दिवा), सोमनाथ सुभाष सूर्यवंशी (27), केदार पवार (28),गौरव विष्णू चौधरी(20), चैतन्य हेमंत ढोबळे (21 ,रा. कल्याण) व आकाश जयचंद चव्हाण (20 ,रा. दिघा) अशी जखमी गोविंदा ची नावे आहेत.अशी माहिती कळवा हॉस्पिटल येथून मिळालेली माहिती .

SW/KA/SL

7 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *