या देशातील 42 हजार महिलांनी केले गन परवान्यासाठी अर्ज
जेरुसलम, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्रायल आणि हमास यांचे युद्ध सुरु होऊन आठ महिने झाले आहेत. गेल्यावर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर इस्रायलने गेली आठ महिने गाझापट्टी संपूर्ण भाजून काढली आहे. या भीषण पार्श्वभूमीवर हमासच्या अतिरेक्यांनी गेल्यावर्षी केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या महिला स्वत: असुरक्षित समजत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी बंदूकीचा परवान्यासाठी अर्ज केला आहे. 42 हजार महिलांनी गनसाठी परवाना मिळावा असा अर्ज केला आहे. तेथे आता 18 हजार अर्जांना स्वीकारण्यात आले आहे.
जेव्हापासून इस्रायलमध्ये उजव्या विचारांचे सरकार आले आहे. तेव्हापासूनच नेत्यान्याहू यांच्या सरकारने स्व-संरक्षणासाठी गन खरेदीचे नियम शिथील केले आहेत. त्यामुळे महिला आता पुढे येऊन बंदूकी खरेदीसाठी अर्ज करीत आहेत. सध्या इस्रायलमध्ये 15 हजाराहून अधिक महिलांकडे बंदूक आहे. तर दहा हजार महिला बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. आपल्या सुरक्षेसंदर्भात महिला आता अधिक चिंतीत झाल्या आहेत.
हमासच्या हल्ल्यानंतर आपल्या कुटुंबाचे संरक्षण व्हावे यासाठी महिलांची पहिली प्राथमिकता झाली आहे. त्यामुळे बंदूकीला स्वत:चे आणि स्वत:च्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी जास्त जवळ केले जात आहे. परंतू प्रत्येकाला ही बंदूक संस्कृती पसंद नाही अनेक जण या निर्णयामुळे नाराज देखील आहेत. त्यामुळे या धोरणावर टीका देखील होत आहे.
SL/ML/SL
25 June 2024