राज्यात ४१ नवीन कौटुंबिक न्यायालये

 राज्यात ४१ नवीन कौटुंबिक न्यायालये

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात दिवसेंदिवस कौटुंबिक वादांची संख्या वाढत असून कौटुंबिक न्यायालयांची अधिक गरज लक्षात घेऊन राज्यात आणखी ४१ कौटुंबिक न्यायालयाने स्थापन करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

उद्धव ठाकरे गटाचे विलास पोतनीस यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. मुंबईतही आणखी १७ कौटुंबिक न्यायालयं सुरू करणार असून जिथे नागरीकरण जास्त आहे तिथे ही न्यायालयाने स्थापन करणार असल्याचं ते म्हणाले.

आतापर्यंत २५जिल्ह्यांमध्ये कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यात आली असून हळूहळू सर्व जिल्ह्यांमधे ही न्यायालये स्थापन करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.41 new family courts in the state

ML/KA/PGB
3 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *