अखेर त्या ४१ मजुरांची सुखरूप सुटका
दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेले सतरा दिवस सुरू असलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आले असून उत्तराखंडच्या सियाल्कारी बोगद्यात १२ नोव्हेंबरपासून अडकलेल्या ४१ कामगारांची आज सायंकाळी उशिरा सुटका करण्यात आली.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) जवानांनी दोरीला बांधलेल्या चाकांच्या स्ट्रेचरच्या मदतीने अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. 12 नोव्हेंबर रोजी सियाल्क्यरा बाजूपासून 205 ते 260 मीटर अंतरावरील बोगद्याचा एक भाग कोसळला होता. जे कामगार 260 मीटरच्या पलीकडे होते ते अडकले होते, त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला होता.
आपत्ती व्यवस्थापन विभाग , भारतीय लष्कर , खाण तज्ञ , परदेशी तंत्रज्ञ आणि असंख्य मदतनिसांची मदत घेऊन गेले १७ दिवस विविध मार्गांनी मजुरांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू होते , त्याला आज यश आले.
या मजुरांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांना रुग्णवाहिकांमधून जवळच्या सुसज्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ML/KA/PGB 28 Nov 2023