MHADA मुख्यालयात ४० दलालांना प्रवेश बंदी

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : MHADAच्या मुख्य दक्षता आणि सुरक्षा विभागाने म्हाडा मुख्यालयातील तब्बल ४० दलालांना काळ्या यादीत टाकले आहे.या कारवाईनंतर या दलालांना MHADAच्या मुख्यालयात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. म्हाडाचे मुख्य दक्षता व सुरक्षा विभाग अधिकारी विनीत अग्रवाल यांनी माहितीला दुजोरा दिला आहे.
MHADA मुख्यालयात येणार्या नागरिकांना आपल्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्यास वेळ मिळत नाही. यातच कर्मचारी अधिकारी इतर कामांमध्ये व्यस्त असतात.त्यामुळे म्हाडा कार्यालयात चकरा मारताना वेळेची बचत आणि झटपट काम करून घेण्यासाठी काही लोक दलालांची मदत घेतात.याठिकाणी घर देण्याचे खोटे आश्वासन देत दलाल नागरिकांची फसवणूक करतात.असे प्रकार वाढत चालले होते. फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये काही दलालांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. अशा व्यक्तींना म्हाडा मुख्यालयात प्रवेश नाकारण्यात आला आहे.ही दलाल मंडळी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होती.त्यामुळे अशा सुमारे ३० दलालांना म्हाडाच्या मुख्य दक्षता आणि सुरक्षा विभागाने काळ्या यादीत टाकले होते.यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये आणखी काही दलालांच्या तक्रारी दक्षता विभागाकडे प्राप्त झाल्या.त्यानुसार आणखी १० दलालांना काळ्या यादीत टाकून त्यांना म्हाडा कार्यालयात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
SL/ML/SL
27 Feb. 2025