४ जूननंतर उद्धव ठाकरे भाजपासोबत जाऊ शकतात
छ संभाजीनगर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे यांना गरज पडल्यास सर्वप्रथम मी पुढे येईल असं विधान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले त्यावर बोलताना पंतप्रधान मोदींनी सूचक वक्तव्य केले असून उद्धव ठाकरे मुस्लिम मत मिळवण्यासाठी कॉंग्रेसबरोबर गेले असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यामुळेच शिवसेना उद्धव ठाकरे गट उमेदवार धर्मवादी राहीले नसून धर्मनिरपेक्ष झाले आहेत.
रश्मी ठाकरे आणि अमित शहा यांची भेट झाल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली. कल्याण येथे श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात शिवसेना उबाठा गटाने कुमकुवत उमेदवार दिला. त्यामुळेच उद्याच्या निकालानंतर शिवसेना उबाठा गट आणि भाजप एकत्र येऊ शकते असेही त्यांनी स्पष्ट केले. मुस्लिमांनी शिवसेना उबाठा गटापासून सावध रहावे असा सल्लाही बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला. कॉंग्रेस, एमआयएम , शिवसेना उबाठा गट यांचा मुस्लिमांची मत मिळवणे हा एककलमी कार्यक्रम असल्याचाही आरोप त्यांनी केला.
जालना लोकसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार देवगन यांच्या प्रचारासभेसाठी फुलंब्री विधानसभा मतदारसंघात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हापूरच्या गादीला पाठींबा दिला मात्र साताऱ्याच्या नाही यावर बोलताना कोल्हापूरच्या गादीशी आमची वैचारीक बैठक आहे, शरद पवार यांनी मागे शाहू महाराजांचा पराभव केला होता त्यामुळेच आम्ही शाहू महाराजांना पाठींबा दिला. छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आहेत मात्र सातारा गादी सांभाळणारे राजकारणात आहे. ज्यांनी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक वैदीक पद्धतीने करायला विरोध केला त्यांच्याच बरोबर आज सातारा गादीचे वंशज राजकारणात आहे, असं स्पष्टीकरण ॲड प्रकाश आंबेडकर यांनी दिले.
वंचित आघाडीला काही ठिकाणी एमआयएम पक्षाने पाठींबा दिला, यावर बोलताना आम्ही तो मागितला नाही, २०१९ च्या निवडणूकीत त्यांच्यामुळे आमचा पराभव झाला, विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमच्यासोबतची आघाडी मोडली त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही अस त्यांनी सांगितलं. प्रचारात मुद्दे नसून खालच्या स्तरावर प्रचार सुरु आहे, १४ लाख भारतीयांनी आपल नागरिकत्व सोडत परदेशात स्थायिक झाले यावर मोदी शहा बोलत नाही आणि विरोधी पक्षही बोलत नाही ही शोकांतिका असल्याची खंत बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली.
मराठवाडा दुष्काळाने होरपळतोय, शेतकरी आत्महत्या करत आहे मात्र प्रचारातून हे मुद्दे कोणीच मांडत नाही यावर बोलताना मराठवाड्यातील जनतेलाच हे प्रश्न सोडवायचे नाही असा माझा आरोप आहे. मागील निवडणुकीत दुष्काळ प्रश्न सोडवण्यासाठी मी आराखडा मांडला मात्र जनतेने तो नाकारला असही ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी माध्यमांना सांगितले.
ML/ML/PGB 2 May 2024