अहमदाबादमधुन ISIS च्या ४ दहशतवाद्यांना ATS कडून अटक
अहमदाबाद, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरातमध्ये आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांना गुजरात एटीएस (ने अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टवरून अटक केली. चारही दहशतवादी श्रीलंकन नागरिक आहेत. हे चार दहशतवादी कोणत्या उद्देशाने गुजरातमध्ये आले होते याचा गुजरात एटीएस तपास करत आहे. गुजरात एटीएस या चार जणांना अज्ञातस्थळी घेऊन गेले आहेत. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली जात आहे. गुजरातच्या किनारपट्टीला नुकतेच अनेक पाकिस्तानी नागरिकांना पकडण्यात आले होते.
सुत्रांच्या माहितीनुसार हे दहशतवादी अहमदाबाद एअरपोर्टवर पाकिस्तानमध्ये बसलेल्या आपल्या बॉसच्या संदेशची वाट पहात होते. मात्र त्याआधीच त्यांना गुजरात एटीएसने पकडले. हे दहशतवादी शस्त्रे मिळवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र शस्त्रे मिळवण्याआधीच सर्वांना गुजरात एटीएसने अटक केली. या कारवाईनंतर गुजरातचे डीजीपींनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. सध्या त्यांची चौकशी केली जात आहे.
दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर संपूर्ण एअरपोर्टची सुरक्षा वाढवली आहे. विशेष म्हणजे आयपीएलमधील तीन संघ अहमदाबाद एअरपोर्टवर पोहोचण्याआधी या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. गुजरात पोलिसांच्या सुत्रांनी सांगितले की, अहमदाबाद एअरपोर्टवर इस्लामिक स्टेटच्या चार दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. हे चार जण आधी चेन्नईत आले त्यानंतर अहमदाबाद एअरपोर्टवर उतरले.
SL/ML/SL
20 May 2024