कोलकाता बलात्कार प्रकरणी माजी प्राचार्यासह ४ जणांना अटक

 कोलकाता बलात्कार प्रकरणी माजी प्राचार्यासह ४ जणांना अटक

कोलकाता, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला डॉक्टरवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे चर्चेत असलेल्या कोलकात्याच्या RG Kar मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि इतर तिघांना CBIने काल अटक केली. आज, मंगळवारी संदीप घोष यांना रुग्णालयाशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारी अटकेनंतर सीबीआयच्या पथकाने चारही आरोपींना लाचलुचपत प्रतिबंधक शाखेत आणले. जिथे बीआर सिंग हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमने त्यांची वैद्यकीय चाचणी केली.

सीबीआयने २४ ऑगस्ट रोजी आरजी कर हॉस्पिटलमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी घोष यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) 28 ऑगस्ट रोजी संदीप घोष यांचे सदस्यत्व निलंबित केले.

आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 8-9 ऑगस्टच्या रात्री एका 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. ९ ऑगस्टला सकाळी डॉक्टरचा मृतदेह सापडला. तेव्हापासून बंगालमध्ये सातत्याने निदर्शने सुरू आहेत.

आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 8-9 ऑगस्टच्या रात्री एका 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. ९ ऑगस्टला सकाळी डॉक्टरचा मृतदेह सापडला. यानंतर देशभरातील डॉक्टर रस्त्यावर उतरले. सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यानंतर अनेक रुग्णालयांच्या डॉक्टरांनी संप रद्द केला. मात्र, बंगालमध्ये आंदोलन सुरूच आहे.

कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. 29 ऑगस्ट रोजी एजन्सीने रुग्णालयातील दोन सुरक्षा रक्षकांची पॉलीग्राफ चाचणी (लाय डिटेक्टर चाचणी) केली होती. त्या रात्री रुग्णालयाच्या मुख्य गेटवर दोन्ही सुरक्षारक्षक तैनात होते. संजय बाईकवर आला आणि गाडी पार्क करून तिसऱ्या मजल्यावर गेला.

25 ऑगस्ट रोजी सीबीआयने सेंट्रल फॉरेन्सिक टीमच्या मदतीने कोलकाता प्रेसिडेन्सी जेलमध्ये संजयची पॉलीग्राफ चाचणी केली होती. सुमारे ३ तास ​​अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. संजयसह एकूण 10 जणांची आतापर्यंत पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये आरजी करचे माजी प्राचार्य संदीप घोष, एएसआय अनुप दत्ता, चार सहकारी डॉक्टर, एक स्वयंसेवक आणि दोन रक्षकांचा समावेश आहे.

SL/ML/SL
3 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *