तत्काळ नोकरी सोडा 4 लाख मिळवा, प्रसिद्ध कंपनीची अनोखी ऑफर

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
काही आंतरराष्ट्रीय कंपन्या कर्मचारी कपातीसाठी विविध युक्त्या करत आहेत.अॅमेझॉन कंपनी भारतातील सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. जगातील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने (Amazon) आपल्या कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. ऑन द स्पॉट नोकरी सोडा 4 लाख मिळवा अशी ही ऑफर आहे. अॅमेझॉन कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यासाठी दिलेल्या ऑफरमागचे कारण खूपच इंटरेस्टिंग आहे.
अॅमेझॉन कंपनीचे मालक जेफ बेजोस (Jeff Bezos) हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.जेफ बेजोस हे विशिष्ट धोरणांसाठी ओळखले जातात. यामुळे त्यांचा Pay To Quit प्रोगाम देखील चांगलाच चर्चेत आला आहे.
Amazon मध्ये नोकरी हा अनेक तरुणांसाठी ड्रीम जॉब असतो. अनेकजण Amazon मध्ये नोकरी करण्याचा अनुभव घेतात. Amazon चे मालक जेफ बेजोस हे वेगळा विचार करतात. कंपनीला नव नविन आयडिया मिळाव्यात यासाठी नविन स्टाफची गरज आहे. यामुळे जास्तीत जास्त नविन कर्मचाऱ्यांना संधी देण्यासाठी Amazon कंपनीने Pay To Quit प्रोगाम ही संकल्पना मांडली आहे.
Pay To Quit प्रोगाम अंतर्गत नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना Amazon अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. नविन नोकरी मिळेपर्यंत कंपनी कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य करणार आहे. Pay To Quit प्रोगाम अंतर्गत Amazon कंपनी नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या करिअरची पूर्ण काळजी घेणार आहे. यामुळे नविन नोकरी मिळवताना कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही असा दावा कंपनीने केला आहे.
SL/KA/SL
8 Nov. 2023