वणी सापुतारा मार्गावर भीषण अपघातात ४ ठार
नाशिक, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वणी – सापुतारा महामार्ग हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला असून गेल्या काही महिन्यांमध्ये मोठमोठे अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत.
काल संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान खोरी फाट्या नजीक मारुती सियाज व क्रुझर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन चौघांचा मृत्यू झाला आहे तर अन्य नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.
त्यामध्ये विनायक गोविंदा क्षीरसागर वय 37, योगेश दिलीप वाघ वय 18, जतिन अनिल पावडे वय 23, रवींद्र मोतीचंद चव्हाण हे सियाज कार क्रमांक एम एच 41 व्ही 7787 या गाडीने सापुतारा कडून वणीच्या दिशेने येत असताना समोरून येणारी क्रूजर गाडी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातातील वणी येथील चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची भीषणता बघता आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ बाहेर काढले. या अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे पोलीसानी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात पोहोचवले.
या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हालवण्यात आले आहे. जखमी रुग्णांमध्ये कमळी युवराज गांगोडे वय 40, कल्पना सुभाष सोळसे वय 19, तुळशीराम गोविंदा भोये वय 28, ललिता युवराज कडाळे वय 30, रोहिदास पांडुरंग कडाळे वय २५, योगेश मधुकर सोळसे वय १५, सुभाष काशिनाथ सोळसे वय 15 , देवेंद्र सुभाष सोळसे वय 47, नेहल सुभाष सोळसे वय 7 सर्व रा. केळवण, सुरगाणा येथील आहेत. या भीषण अपघातात वणी गावातील चार जणांचा अंत झाल्याने 1 जुलै रोजी वणी बंद चा निर्णय घेण्यात आला आहे.
ML/KA/SL
1 July 2023