तीर्थक्षेत्र पोहरादेवीच्या विकासासाठी 393 कोटी

 तीर्थक्षेत्र पोहरादेवीच्या विकासासाठी 393 कोटी

ठाणे, दि. २५(एमएमसी न्यूज नेटवर्क): बंजारा समाजाचे तिर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द येथील रस्ते,भाविक भक्तांकरीता निवास, मंदिर बांधकामांकरीता, 393 कोटी रुपयांचा विकासकामाला मंजुरी देण्यात आली आहे.

तीर्थक्षेत्र पोहरादेवी विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर विधानभवनात झाली. या बैठकीत बंजारा धर्मगुरू बाबुसिंग महाराज, मंत्री संजय राठोड, गिरीश महाजन,अतुल सावे, रविंद्र चव्हाण, एआयबीएसएस अध्यक्ष शंकर पवार उपस्थित होते.

ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार म्हणाले की, बंजारा समाजाचे तिर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द येथील रस्ते,भाविक भक्तांकरीता निवास, मंदिर बांधकामांकरीता, 393 कोटी रुपयांचा विकासकामाला मंजुरी देण्यात आली आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून एवढ्या मोठ्याप्रमाणात निधी या तीर्थक्षेत्राला मिळाले नव्हते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आणि मंत्री संजय राठोड यांच्या पाठपुरावामूळे तीर्थक्षेत्र पोहोरदेवीला एवढ्या मोठ्याप्रमाणात निधी मिळाला आहे.

त्यामुळे देशातील 14 कोटी बंजारा समाजाच्यावतीने आम्ही या सरकारचा आभार मानत असल्याचे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार यावेळी म्हणाले.

ML/KA/SL

25 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *