35 हजार प्रज्वलित पणत्यांनी झाली रामनाम अक्षरे साकार…

चंद्रपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :चंद्रपुरात 35 हजार प्रज्वलित पणत्यांनी रामनाम अक्षरे साकार करण्याचा विश्वविक्रम केला गेला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय समितीच्या वतीने चांदा क्लब मैदानावर यासाठीचा प्रयत्न केला गेला. गिनीज बुक रेकॉर्ड समितीच्या पथकाने यासाठी सर्व निकषांची तपासणी केली.
शहरातील रामभक्त आणि नागरिकांना हा विश्वविक्रम अचूकतेने करता यावा यासाठी एका प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन देखील करण्यात आले. यात ठराविक वेळेत या पणत्या प्रज्वलित करण्यासाठी विशेष काळजी काय घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अयोध्येतील रामलल्ला मूर्ती स्थापनेच्या विविध कार्यक्रमांच्या मालिकेत चंद्रपूरचा हा प्रयत्न होता.
” सियावर रामचंद्र की जय “
ही अक्षरे 35 हजार प्रज्वलित पणत्याद्वारे साकारून केला जाणारा विश्वविक्रम लक्षवेधी ठरला आहे. विक्रमाबाबतची अधिकृत घोषणा काही तासात केली जाणार आहे याच मैदानावर 21 आणि 22 जानेवारी या कालावधीत पुनीत इस्सार यांचे महारामायण नाट्य आणि महिला तबलावादक अनुराधा पाल यांच्या सादरीकरणाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. 35,000 lighted pantas made Ramnaam letters.
ML/KA/PGB
21 Jan 2024