अंबाबारवा अभयारण्यात प्राणी गणनेत ३३१ प्राण्यांचे दर्शन

बुलडाणा, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या अंबाबरवा अभयारण्यातील वन्यप्राण्यांची गणना २३ मे रोजी सायंकाळ पासून तर २४ मे च्या सकाळ पर्यंत करण्यात आली. यावेळी अंबाबरवा जंगलात दोन बाघोबांचे दर्शन झाल्यामुळे वन्यजिव प्रेमींसह कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. प्राणीप्रेमी आणि वन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चंद्राच्या प्रकाशात अभयारण्यातील व्याग्र शिवारातील २ दोन वाघांसह ३३१ वन्यप्राण्यांची नोंद घेतली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात बुद्धपौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमांतर्गत चंद्राच्या लखलखीत प्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. यावेळी अंबाबारवा अभयारण्यात एकूण ५ वर्तुळ असून ११ बीटच्या माध्यमातून प्राणी गणना झाली आहे. यामध्ये ३३१ विविध प्रकारच्या वन्य प्राण्यांनी दर्शन दिले. यामध्ये ३३१ विविध प्रकारच्या वन्य प्राण्यांनी दर्शन दिले. दरम्यान १९ वनरक्षक, ४९ वनमजूर, ५ वनपाल, ५ विशेष व्याघ्रदलाचे जवान कर्तव्यावर होते. यामध्ये चिखलदरा ट्रेनींग सेंटर येथील १५ वनरक्षकानी निसर्ग अनुभव कायक्रमाध्ये सहभाग घेतला. यावर्षी अभयारण्यात निसर्ग अनुभव कार्यक्रमामध्ये प्रवेश मिळाल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यावर्षी ३१ पाणवठ्यावर उभारलेल्या ३१ मचाणव्दारे प्राण्यांचे निरीक्षण करून नोंदी करण्यात आल्या.

यावेळी करण्यात आलेल्या नोंदीनुसार, वाघ २, अस्वल १०, नील गाय २६, सांबर २९, भेडकी ११, गवा १२, रान डुक्कर ३७, लंगूर १, माकड १११, म्हसण्या उद २, रान कोंबडी ५, मोर ७४, ससा ४, रान कुत्रा २, मुगुस १, चौसिंगा ४, असे एकूण ३३१ प्राण्यांनी दर्शन दिले.
ML/ML/SL
26 May 2024