रस्ते सफाईसाठी या शहरात वापरले जाणार ३३ कोटींचे यांत्रिक झाडू

 रस्ते सफाईसाठी या शहरात वापरले जाणार ३३ कोटींचे यांत्रिक झाडू

नाशिक, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून नाशिक महापालिकेला विविध उपक्रम राबविले जात आहेत.आता शहराच्या रस्ते स्वच्छतेसाठी महापालिकेने इटलीहून खरेदी केलेले ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू खरेदी केले आहेत. दिवाळीनंतर या यांत्रिक झाडूंचे आरटीओ पासिंग करण्यात येईल. त्यानंतर हे यांत्रिक झाडू वापरून शहर स्वच्छतेस सुरुवात होणार आहे. शहरातील जवळपास २८० किलोमीटर मुख्य रस्त्यांची यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून सफाई होईल. विशेष बाब म्हणजे रस्ते झाडताना धूळ उडते, वाहतुकीला अडथळा निर्माण होतो त्यामुळे यांत्रिकी झाडूमार्फत रात्रीच्या वेळी स्वच्छता केली जाणार आहे.

नाशिक शहरात दोन हजार १५० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. एका यांत्रिकी झाडूसाठी दोन कोटी सहा लाख रुपये, असे एकूण १२ कोटी ३६ लाख रुपये खर्च होणार आहे. पुढील पाच वर्षांच्या कालावधीत ऑपरेशन, देखभाल दुरुस्ती, इंधन, मनुष्यबळ पुरविण्यासाठी दरमहा पाच लाख ८५ हजार ७०० रुपये खर्च होणार आहे.

पाच वर्षांसाठी २१ कोटी आठ लाख रुपये खर्च होईल. साडेतीन मीटर रुंद रस्त्यावर एका यांत्रिकी झाडूमार्फत ४० किलोमीटरप्रमाणे प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्याची सफाई केली जाणार आहे. महापालिकेकडे सध्या दोन हजार ८०० सफाई कर्मचारी व आउटसोर्सिंगचे ७०० कर्मचाऱ्यांमार्फत सफाई होते. एका सफाई कर्मचाऱ्याकडून दोन्ही बाजूंनी ५०० मीटर, असे साधारण एक किलोमीटर रस्ते झाडलोट अपेक्षित आहे. यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून सफाई सुरू झाल्यास १६० मनुष्यबळ वाचेल. ते मनुष्यबळ अंतर्गत रस्त्यांची झाडलोट करण्यासाठी वापरले जाणार आहे.

या बरोबरच नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत हवा गुणवत्ता नियंत्रणाबरोबरच रोजचे निरीक्षण नोंदविण्यासाठी केंद्र उभारणे, विद्युतदाहिनी बसविणे, बांधकाम डेब्रिज विल्हेवाट प्रकल्प, दुभाजकांमध्ये शोष वनस्पती, एकीकृत सिग्नल प्रणाली, सुलभ शौचालयांवर सोलर रूफ टॉप बसविणे इ. कामेही हाती घेतली जाणार आहेत.

SL/KA/SL

9 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *