सिंधुदुर्ग जिल्ह्यात 325 पैकी 32 ग्रामपंचायती बिनविरोध

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात 325 पैकी 32 ग्रामपंचायती बिनविरोध

सिंधुदुर्ग, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 325 पैकी 32 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत .तर 1025 प्रभागांपैकी 129 प्रभाग उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत .

त्यामुळे 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष निवडणुकीत सरपंच पदासाठी 790 तर सदस्य पदांसाठी 4619 एवढे उमेदवार रिंगणात आहेत एकूण 325 पैकी आता 293 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे . दरम्यान बिनविरोध निवड झालेले सरपंच आणि सदस्य हे बहुतांशी भाजप पुरस्कृत असून उर्वरित 293 पैकी 250 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे .

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्रितरित्या ग्रामपंचायत निवडणूक लढवत आहे आणि आमचे सरकार हे गावाच्या विकासावर भर देणारे सरकार असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त संख्येने निवडून येऊ असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला . बिनविरोध निवड झालेले सरपंच आणि सदस्य यांचा सत्कार नितेश राणे यांनी केला.

ML/KA/SL

9 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *