प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबवर 32 गुन्हे दाखल

 प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबवर 32 गुन्हे दाखल

मुंबई, दि. १७ : प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब वर तब्बल 32 FIR दाखल करण्यात आल्या आहेत. क्रिप्टो फ्रॉड केसमध्ये जावेद हबीबचं नाव जोडलं गेलं आहे.उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील पोलिसांच्या टीमने बुधवारी जावेदच्या घरी छापा टाकला. पण पोलिसांना जावेद घरी सापडला नाही.पोलिसांच्या माहितीनुसार, जावेद इंटरोगेशनपासून स्वत:चा बचाव करत आहे आणि तो सध्या फरार आहे. पोलीस तपासात सहकार्य करण्याचा आदेश जावेदला देण्यात आला आहे.

हबीबवर जवळपास 5 ते 7 कोटी रुपयांच्या इन्वेस्टमेंट स्कॅमचा आरोप करण्यात आला आहे. आतापर्यंत जावेद विरोधात 32 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जवळपास 150 लोकांनी या स्कीममध्ये गुंतवणूक केली. पण अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर कोणालाच रिटर्न्स मिळालं नाही. याप्रकरणी त्याचा मुलगा अनस आणि एक पार्टनर सैफुलचंही नाव समोर आलं आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, या लोकांनी हाय रिटर्न्सच्या लोभापोटी लोकांकडून पैसै घेतले. पण निश्चित काळानंतरही गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हबीब आणि त्याच्या साथीदारांनी एफएलसी नावाच्या एक फेक स्किमच्या माध्यमातून लोकांनी गुंतवणूक केलीय. या स्कीमच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून 5 ते 7 लाख रुपये घेण्यात आले. त्यांना बिटकॉन (Bitcoin) आणि बायनान्स (Binance Coin) कॉईनमध्ये 50 टक्क्यांपासून ते 70 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळणार. 2023 मध्ये संभलच्य रॉयल पॅलेस वेंकेट हॉलमध्ये एक इव्हेंटही झालं होतं. ज्यामध्ये या स्कीमला प्रमोट करण्यात आलं होतं.

SL/ML/SL 17 Oct. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *