अकोल्यात साकारली शिवाजी महाराजांची 30 हजार स्क्वेअर फूट रांगोळी
अकोला दि १९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना म्हणून अकोल्यातील अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पांडे व चतुर्भुज आर्टचे संचालक अनिल काळे यांच्या संकल्पनेतून ३०,००० स्क्वेअर फूट रांगोळी काढून महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. १५ विद्यार्थ्यांनी सहा दिवसाच्या अथक परिश्रमातून ही प्रतिमा साकारली आहे. पाच वर्षांपासून शिवजयंती महाविद्यालयात साजरी करण्यात येते. इतकी भव्य रांगोळी काढण्याचे हे तिसरे वर्ष आहे. ही प्रतिमा साकारण्याकरिता ४० क्विंटल रांगोळी लागली. सर्वप्रथम मैदानाची आखणी करण्यात आली त्यानंतर प्रतिमेचे रेखाटन करण्यात आले व नंतर ४० क्विंटल रांगोळी टाकण्यात आली. महाराज सिंहासनावर विराजमान आहेत असा हा देखावा या प्रतिमेतून दिसून येतो.ML/ML/MS