गुंतवणूकदारांची 3000 कोटी रुपयांची फसवणूक, मुख्य सूत्रधार अटकेत

 गुंतवणूकदारांची 3000 कोटी रुपयांची फसवणूक, मुख्य सूत्रधार अटकेत

कोल्हापूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुंतवणूकदारांची सुमारे 3000 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ए एस ट्रेडर्स कंपनीचा प्रमुख आणि फसवणुकीतील मुख्य सूत्रधार लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार याला अखेर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं त्याला कोल्हापूर जिल्ह्यातून अटक केली.

पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी या गुन्हयामध्ये फिर्यादी मध्ये दिलेल्या आरोपी व्यतिरीक्त आणखीन ५ आरोपी निष्पन्न करून लोहितसिंग सुभेदार सह ७ आरोपींंना अटक केली आहे. या फसवणुकीच्या प्रकरणात नऊ संशयिताना पोलिसांनी अटक केली असून ते कारागृहात आहेत.या प्रकरणात चार कोटी रुपयांची वाहनं आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी संचालकांची बँक खाते गोठवली आहेत.

मालमत्ता विक्रीच्या व्यवहारावर निर्बंध आणले आहेत कोल्हापूर सह पुणे जळगावला या प्रकरणी दाखल झाले आहेत.
ए.एस.ट्रेडर्स अॅण्ड डेव्हलपर्स आणि त्यांच्या सलग्न उप कंपन्यांविरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड या करीत आहोत.

नोव्हेंबर २०२२ मध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्यात ए. एस. ट्रेडर्स विरोधात दाखल झालेल्या गुन्हयामध्ये तत्कालीन तपासी अधिकारी यांनी १ आरोपी विक्रम नाळे याला अटक केली होती. त्यानंतर मार्च २०२३ मध्ये या गुन्हयाची व्याप्ती पाहता हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडील तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी आरोपी अमित शिंदे, विजय पाटील, संतोष मंडलीक, प्रविण पाटील,चांद काझी, नामदेव पाटील यांच्याकडून थार, हुंडाई, टाटा सफारी, सिलॅरीओ अशा चार चाकी ४ गाड्या आणि ३ दुचाकी गाडया जप्त करण्यात आल्या होत्या.

त्यानंतर या गुन्हयाचा तपास कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वाती
गायकवाड यांच्याकडे जुलै २०२३ पासून वर्ग करण्यात आला. अटक आरोपीमध्ये सुवर्णा श्रीरंग सरनाईक -संचालक, बाळासाहेब कृष्णात धनगर -एजंट, बाबासाहेब भुपाल धनगर -संचालक, अमित अरूण शिंदे -एजंट, आशिष बाबासाहेब गावडे -एजंट, श्रुतीका वसंतराव सावेकर / परीट -कंपनी अँडमिन, साहेबराव सुबराव शेळके -एजंट आणि लोहितसिंग धर्मसिंग सुभेदार अशांना अटक करण्यात आलेली आहे.

आजपावेतो वरील अटक आरोपी यांच्याकडे नवी मुंबई शहरामध्ये बाबासाहेब धनगर आणि पाहिजे आरोपी बाबु कृष्णा हजारे यांनी खरेदी केलेले एकूण ६ फ्लॅट आणि वंदुर ता.कागल येथील ५ एकर जमीन, उजळाईवाडी, मुडशिंगी, के.आय.टी कॉलेज जवळील एकूण ३ प्लॉट, दोन दुचाकी ही मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

आरोपी अमित शिंदे याचे कदमवाडी कोल्हापूर येथील १ पेंन्ट हाऊस, १ फ्लॅट, पाडळी येथील १२ गुंठे जागा, पळसंबे ता. गगनबावडा येथील ८ एकर जमीन, तसेच बाबासाहेब धनगर याची चार चाकी, दुचाकी वाहनं, श्रुतिका सावेकर हिचे ६ लाख रुपयांचे दागिने, तस्च लोहीतसिंग सुभेदार याच्या पत्नीकडून २५ लाख रुपयांचे दागिने आणि अडीच लाख रुपयांचे डायमंड हस्तगत करण्यात आलेले आहेत. जुलै २०२३ पासून सुमारे १२ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा शोध लावला असून जप्तीची प्रक्रीया सुरु आहे.

तसंच ए.एस.ट्रेडर्स आणि तिच्या सलग्न उप कंपन्या यांची बँक खाती सिज करुन त्यावरील ३ कोटी ९६ लाख रुपये सिज करण्यात आलेले आहेत. या गुन्हयातील मुख्य आरोपी लोहितसिंग सुभेदार गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपीचा शोध सुरू असतांना ळकाल पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड यांना गोपनीय बातमीच्या आधारे मुख्य आरोपी लोहीतसिंग सुभेदार नवी मुंबई इथून कोल्हापूर करीता येत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. बातमीच्या आधारे स्वत: पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड आणि त्यांच्या पथकानं पेठ नाका आणि किणी टोल नाका परीसरामध्ये सापळा लावून आरोपीस शिताफीनं अटक करण्यात आली. आरोपीस आज रोजी न्यायालयामध्ये हजर करून त्याची पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास सुरु आहे.

ML/KA/SL

20 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *