दिवाळीत चांगली बातमी, कर्करोगाच्या उपचारासाठी वापरली जाणारी ३ महत्वाची औषधं स्वस्त, सरकारचा निर्णय
दिवाळीच्या तोंडावर सरकारने कॅन्सर रुग्णाला दिलासा दिला आहे. कॅन्सरवरील उपचारात वापरली जाणारी महत्वाची तीन औषधे सरकारने स्वस्त केली आहेत. या संदर्भात सरकारने आदेश देखील काढले आहेत. देशात जीवनावश्यक औषधांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचे काम राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण ( NPPA ) करत असते. आता एनपीपीएने कॅन्सरवर उपचारासाठी वापरली जाणारी ट्रॅस्टुजुमाब(Trastuzumab), ओसिमर्टिनिब (Osimertinib) आणि डुर्वालुमाब (Durvalumab) या औषधांची एमआरपी कमी करण्याचे आदेश दिले आहेत.ही औषधे ब्रेस्ट आणि फुप्फुसाच्या कॅन्सरवरील उपचारासाठी वापरली जातात.