गडचिरोली मध्ये दोन महिला माओवादी ठार….

 गडचिरोली मध्ये दोन महिला माओवादी ठार….

गडचिरोली दि १७: एटापल्ली तालुक्यातील मौजा मोडस्के जंगल परिसरात आज गडचिरोली C ६० पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत दोन जहाल महिला माओवाद्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळीून ए-के-47 रायफल, एक पिस्तूल, अनेक जिवंत काडतुस व मोठ्या प्रमाणावर माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की ही मोहीम गोपनीय माहितीच्या आधारे राबवली गेली असून शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

गडचिरोली C ६० पोलीस दलाला मिळालेल्या माहितीनुसार गट्टा दलमचे काही माओवादी घटनास्थळी दबा धरून बसले होते; सी-60 कमांडो, पोस्टे गट्टा पथक आणि CRPF 191 बटालियनच्या ई कंपनीने संयुक्तपणे घेराबंदी व सर्च ऑपरेशन राबवले असता माओवाद्यांनी जवानांकडे अंदाधुंद गोळीबार केला त्याला प्रत्युत्तरात पोलीस जवानांनी गोळीबार केला, त्यानंतर सर्चिंग ऑपरेशन तीव्र करून घटनास्थळी तपासणी केली असता घटनास्थळी दोन महिला माओवाद्यांचे मृतदेह माओवाद्यांचे घटनास्थळीून एक AK-47 रायफल, एक पिस्तूल व भरपूर जिवंत कारतूस आणि माओवादी साहित्य जप्त झाले आहे.

गडचिरोली पोलिसांनी २०२१ पासून ९३ कट्टर माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून अनेकांना अटक व आत्मसमर्पणamध्ये यश मिळाले आहे. आम्ही पुन्हा एकदा सर्व माओवाद्यांना आवाहन करतो — हिंसक मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येऊन कायदा व समाजाच्या मार्गावर येण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केले आहे. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *