पीएम केअर फंडात सार्वजनीक क्षेत्रातील कंपन्यांचे 2913 कोटींचे योगदान
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सार्वजनीक क्षेत्रातील म्हणजेच सरकारी कंपन्यांचे देशाच्या पायाभूत क्षेत्रामध्ये अनमोल असे योगदान आहे. पीएम केअर्स फंडाला लिस्टेड कंपन्यांनी दिलेल्या देणग्यांमध्ये सरकारी कंपन्यांचे योगदान मोठे आहे.राष्ट्रीय शेअर बाजारावर (एनएसई) सूचीबद्ध कंपन्यांवर नजर ठेवणारी फर्म प्राइमइन्फोबेस डॉट कॉमने केलेल्या डेटा विश्लेषणात, सरकारी कंपन्यांनी पीएम केअर्समध्ये सुमारे २,९१३.६ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
बिझनेस स्टँडर्डने ५७ कंपन्यांची ओळख पटवली ज्यामध्ये सरकारचा बहुसंख्य हिस्सा आहे. त्यांचे योगदान पीएम केअरला देणगी दिलेल्या सुमारे २४७ अन्य कंपन्यांपेक्षा जास्त आहे.
४,९१०.५ कोटी रुपयांच्या एकूण देणगी रकमेपैकी ५९.३% योगदान सरकारी कंपन्यांनी (सरकारी आणि खाजगी कंपन्या) दिले. या ५७ कंपन्यांपैकी ओएनजीसी (रु. ३७० कोटी), एनटीपीसी (रु. ३३० कोटी), पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (रु.२७५ कोटी), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (रु.२६५ कोटी) आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (रु.२२२.४ कोटी) या यातील पहिल्या ५ कंपन्या आहेत.
SL/KA/SL
25 April 2023