ख्रिश्चन धर्मगुरूच्या सांगण्यावरून केनियात २९ जणांची आत्महत्या

 ख्रिश्चन धर्मगुरूच्या सांगण्यावरून केनियात २९ जणांची आत्महत्या

नैरोबी, केनिया, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंधश्रद्धेमुळे जीव गमावाव्या लागण्याच्या घटना फक्त भारतातच घडतात असं नाही, तर जगातील काही ठिकाणा देखील अशा घटना घडत असल्याचे समोर येत असते. केनिया या आफ्रिकन देशात एका ख्रिश्चन धर्मगुरूच्या सांगण्यावरून 29 जणांनी उपाशीपोटी सामूहिक आत्महत्या केली. किल्फी प्रांतातील शाकाहोला जंगलातून पोलिसांनी त्यांचे मृतदेह कबरीतून बाहेर काढले आहेत.

येथील गुंड न्यूज इंटरनॅशनल चर्चच्या पाद्रीने या लोकांना सांगितले होते की, जर त्यांनी उपाशी राहून स्वतःला पुरले तर ते येशूला भेटतील आणि स्वर्गात जातील. असे आमिष दाखवले होते. यामुळेच अनेक व्यक्तींचा बळी गेला आहे. तीन दिवसांपासून या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

केनियाच्या पोलिसांनी एकाच कुटुंबातील 5 जणांना कबरीतून बाहेर काढले आहे. ज्यांना येशूला एकत्र भेटायचे होते. पोलिसांना आतापर्यंत 65 कबरी सापडल्या आहेत. यातील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांना आहे. अजूनही कोणीतरी जिवंत असेल या आशेने पोलिस कबर खोदत आहेत. मात्र त्यांच्या हातात केवळ मृत लोकांचे मृतदेह असल्याचे दिसते. यामध्ये अनेक मुलांचाही समावेश आहे.

निर्दोष असल्याचा दावा केला पाद्रीने
ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पॉल मॅकेन्झी नावाच्या पाद्रीला अटक केली. मात्र, त्याने लोकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले नाही, असे तो सतत सांगत असतो. तो म्हणतो की त्याने 2019 मध्येच चर्च बंद केले. मात्र, पोलिसांनी त्याला जामिनावर सोडण्यास नकार दिला आहे. न्यूज वेबसाईट ‘केनिया डेली’नुसार, पोलीस आता सर्व मृतदेहांचे डीएनए नमुने गोळा करत आहेत. जेणेकरून लोक उपासमारीने मरण पावले हे सिद्ध करता येईल.

SL/KA/SL

23 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *