ऑनलाईन गेमिंग वर २८ टक्के GST लागू
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
गेल्या दोन तीन वर्षांपासून देशात ऑनलाईन गेमिंगचे मोठेच पेव फुटले आहे. ऑनलाईन गेमिंगवर येत्या 1 ऑक्टोबरपासून 28 टक्के वस्तू आणि सेवा कर ( GST ) लागू होणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस एंड कस्टम्स ( CBIC ) चे चेअरमन संजय अग्रवाल यांनी सांगितले की गेमिंग कंपन्यांना यासाठी प्रक्रीयेंतर्गत लिगल नोटीस देण्यात आली आहे. सर्व राज्यातील विधीमंडळांनी जीएसटी संशोधन विधेयक 2023 मंजूर करावे किंवा अध्यादेश आणून एक ऑक्टोबर पासून ते लागू करावे असे अग्रवाल यांनी म्हटले आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवर २८ टक्के कर लावण्याच्या GST परिषदेच्या निर्णयासाठी तयार आहे. सीबीआयसीचे अध्यक्ष संजय अग्रवाल यांनी ही माहिती दिली.
जीएसटी काऊन्सिलने जुलैमध्ये ऑनलाईन गेम, अश्व शर्यती आणि कॅसिनोवर 28 टक्के जीएसटी लावण्याची घोषणा केली होती. 2 ऑगस्ट रोजी 51 व्या बैठकीत यासेवांवर जीएसटी लावण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाचे अध्यक्ष संजय अग्रवाल यांनी सांगितले की आम्ही सर्व राज्यांच्या सहमतीने एक ऑक्टोबर पासून ऑनलाईन गेमवर 28 टक्के जीएसटी कर लागू करण्यासाठी तयार आहे. ऑनलाईन गेमिंगवर जीएसटी कराचा कायदा राज्यातील विधानसभेत मंजूर करावा लागेल. काही ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस देणे हा प्रक्रीयेचा भाग आहे.
SL/KA/SL
30 Sept. 2023