कस्टम विभागाकडून 28 कोटीचे सोने जप्त

 कस्टम विभागाकडून 28 कोटीचे सोने जप्त

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई करत दोहा वरून आलेल्या चौघांना अटक केली. त्यांच्या कडून 53 किलो सोने हस्तगत करण्यात आले असून, या सोन्याची किंमत 28 कोटी रुपये आहे.अटक करण्यात आलेल्या दोघांकडून 14,तिसऱ्या कडून 13 आणि चौथ्या कडून 12 किलो सोने जप्त करण्यात आले.या चौघांना काही काळासाठी विदेशात पाठवण्यात आले होते. या चौघांकडे सोने सुरक्षित स्थळी पोहचवण्याचे काम होते. त्या बदल्यात त्यांना मोठी रक्कम मिळणार होती.28 crore gold seized by customs department

हे चौघेही दोहावरून एका फ्लाईटने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले असता,कस्टम विभागाला त्यांचा संशय आला.
त्यांची तपासणी केली असता, त्यांच्या शरीरावर खास डिझाइन केलेल्या पट्ट्यामध्ये सोने लपवून ठेवण्यात आले होते.अनेक खिसे असलेले,त्यांच्या शर्टाभोवती ते गुंडाळलेले होते.जेणे करून कोणाला त्यांचा संशय येणार नाही. मात्र कस्टम विभागाने त्यांची ही चोरी पकडली. या चौघांपैकी एक व्यक्ती महाराष्ट्रतील असून अन्य तीन वेगवेगळ्या राज्यतील असल्याचे स्पष्ट झाले आहे .हे सोने भारतातील एका मोठ्या सोने तस्करासाठी मागवण्यात आले असून तो मूळ आफ्रिकन सोने तस्करासाठी काम करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

कस्टम ने 10 तारखेला या चौघांना अटक केली होती. त्यानंतर सतत केलेल्या चौकशीत सोने तस्करीचा खुलासा झाला असल्याचे कस्टम विभागाने पत्रकात म्हटले आहे.

ML/KA/PGB
13 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *