प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू
बेळगाव, दि. १५ : येथील राणी कित्तूर चन्नमा प्राणी संग्रहालयातील तब्बल 28 काळविटांचा ( संशयास्पद रीतीने मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकच्या वनमंत्र्यांनी दिले आहेत. बेळगाव शहरापासून अवघ्या काही अंतरावर पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला लागून भूतरामनहट्टी गावात हे प्राणी संग्रहालाय आहे. या प्राणी संहग्रहालयातील 28 काळविंटाचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांडरे यांनी दिले आहेत. शनिवारी प्राणी संग्रहालयातील वीस काळविटांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे वन खाते खडबडून जागे झाले आहे.
नोव्हेंबर 13 रोजी आठ काळविटांचा मृत्यू झाला होता. केवळ तीन दिवसांच्या कालावधीत अठ्ठावीस काळविटांचा मृत्यू झाल्याने या मृत काळविटांच्या मृत्यूचे कारण शोधणं हे वन विभागापुढे आव्हान बनलं आहे.
बॅक्ट्येरिया इन्फेक्शन मुळे मृत्यू झाल्याची शंका वन खात्याकडून व्यक्त केली जात आहे. असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट नागराज यांनी प्राणी संग्रहलयाला भेट देऊन याबाबत माहिती घेतली. दोन दिवसापूर्वी मृत झालेल्या काळविटांचे मृतदेह तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहेत. आता शनिवारी मृत झालेल्या काळविटांच्या मृतदेहांची तपासणी करण्यात येणार आहे.
SL/ML/SL