एकोणा कोळसा खाणीमुळे २७ गावांना नरकयातना
चंद्रपूर, दि. २२ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणा कोळसा खाणीमुळे वरोरा तालुक्यातील २७ गावांना नरकयातना भोगाव्या लागताहेत.
कोळश्याच्या वाढत्या मागणीमुळे अलीकडेच वरोरा तालुक्यातील एकोना कोल माईन्स विस्तार करण्यात आला. ३.४४ मिलियन टन प्रति वर्ष इतकी प्रचंड या कोळशा खाणीची उत्पादन क्षमता आहे. मात्र या कोळसा खाणीमुळे स्थानीक गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. 27 villages suffering due to Ekona coal mine
या खदाणीत होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे अनेक घरांना तडे गेले आहेत, कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे तर खदानीतून निघणाऱ्या मातीमुळे नदी-नाल्यांचा मार्ग अवरुद्ध झालाय आणि शेतीचं मोठं नुकसान होत आहे. मुख्य म्हणजे या खाणीमुळे स्थानिकांना रोजगार देखिल मिळालेला नाही.
या विरोधात एकोणा खाणीच्या परिसरातल्या २७ गावातील लोकं एकत्र आले असून एक कृती समितीच्या माध्यमातून याविरोधात लढा उभारण्यात आलाय. एकोणा खाणीच्या विरोधात हे सर्व गावकरी २४ तारखेला खदान बंद पाडण्यासाठी आंदोलन करणार आहेत.
या स्थानिक लोकांचं आंदोलन दाबण्यासाठी राजकीय नेत्यांचा मोठा दबाव असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. त्यामुळे हे आंदोलन भविष्यातल्या संघर्षाची मोठी नांदी ठरणार आहे.
ML/KA/SL
22 Nov. 2022